महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही-माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने खळबळ उडाली आहे. नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे राजकोट किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा झाला होता.त्यावेळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्धघाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं होतं. मात्र हा संपूर्ण पुतळा अचानक कोसळला. मात्र हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेवरुन आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रोष व्यक्त केला आहे.नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होते. मात्र हा पुतळा अचानक कोसळल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. नेमका हा पुतळा कसा कोसळा या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुतळ्याची जबाबदारी देण्यात आली होती. या घटनेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. निवडणुका असल्यामुळे त्या कामात काही गडबड करु नका असेही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.”पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे,” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button