
भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ब्रँड ॲम्बेसेडर
आपल्या अनेकविध मिठाई, नमकीन आणि एकाहून एक सरस स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळे बंधू मिठाईवाले यावर्षी आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना ‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे सदिच्छादूत / ब्रँड ॲम्बेसेडर असतील अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार व इंद्रनील चितळे यांनी केली आहेनजीकच्या भविष्यातील चितळे बंधू यांचा हा प्रवास सचिन तेंडुलकर यांच्या प्रमाणेच परंपरा व ‘स्टार पॉवर’ यांचा संगम असलेला व सचिनच्या चाहत्यांप्रमाणेच ग्राहकांनाही आनंद देणारा असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.