पश्चिम रेल्वेकडून तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार

लोकल ट्रेनने दररोज लाखोंच्या संख्येत नागरिक ये-जा करत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेन हा एक उत्तम पर्याय आहे त्यामुळेच लोकल ट्रेनला मुंबईकरांची लाईफ लाईन मानली जाते.याच लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. कारण, पश्चिम रेल्वेकडून तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येत आहे.पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या 4,74 किलोमीटर कामाच्या विस्तारासाठी पश्चिम रेल्वेने 35 दिवसांचा ब्लॉक घेण्याचं जाहीर केलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून या कामाची सुरुवात होणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत 700 लोकल ट्रेनच्या फेऱ्यांवर परिणाम होणार असून मेल आणि एक्सप्रेस यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लॉक दरम्यान (पाच शनिवार – रविवारी रात्री) सुमारे 130 ते 140 गाड्या रद्द आणि 40 ते 50 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. तर आठवड्याच्या इतर दिवसात कोणत्याही गाड्या रद्द करण्यात येणार नाहीयेत. या ब्लॉक दरम्यान प्रवाशांच्या सहकार्याची अपेक्षा आहे असंही रेल्वेने म्हटलं आहे.प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा ब्लॉक आठवड्याच्या शेवटी आणि रात्रीच्या वेळी घेण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात हे काम स्थगित करण्यात येणार असल्याचंही पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कांदिवली ते बोरिवली दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button