
ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गज नेत्यांसहित कलाकारांचाही समावेश.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गटाने ९० हून अधिक जणांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गट उमेदवारांचा प्रचार करण्यास सज्ज झाला आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गज नेत्यांसहित कलाकारांचाही समावेश आहे. ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत २४ जणांचा समावेश आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा नावाचा समावेश आहे. तसेच स्टार प्रचारकांच्या यादीत युवसेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचा देखील समावेश आहे.