
दुग्धोत्पादनात रत्नागिरी जिल्हा नंबर १ ठरेल
रत्नागिरी जिल्ह्यात मुबलक पाणी व सुर्यप्रकाश आहे. यामुळे येथील दूधाळ जनावरांची प्रतिकार शक्ती चांगली आहे. परिणामी दूधाचा दर्जा चांगला आहे. जिल्ह्यातील शेतकरी हा प्रगल्भ झाला पाहिजे. यासाठी वाशिष्ठी दूध डेअरीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वाशिष्ठीच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. आगामी काळात दुग्धोत्पादनात रत्नागिरी जिल्हा नंबर वन ठरेल, असा विश्वास वाशिष्ठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी देवरूख येथील कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केला.वाशिष्ठी मिल्क ऍण्ड प्रॉडक्टस प्रा. लि. यांच्यावतीने देवरूख येथे शुक्रवारी शहरातील माटे-भोजने सभागृहात शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाला शेतकर्यांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. www.konkantoday.com