
ती तरुणी ट्रेनी नर्स , रिक्षाचालकाने कडवट पाणी दिल्यामुळे बेशुद्ध पडली
रत्नागिरी शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघड झाली असून एका खाजगी रुग्णालयात ट्रेनी नर्स म्हणून प्रशिक्षण घेणार्या एका तरुणीला चंपक मैदान, उद्यमनगर रत्नागिरी येथे बेशुद्ध स्थितीत काही नागरिकांनी पाहिले. त्याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिस यंत्रणेने सदर तरुणीला रत्नागिरीच्या सर्वसाधारण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. तिच्याकडे उपलब्ध असणार्या कागदपत्रांवरुन संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरातील एका गावातील असल्याचे उघड झाले. तिच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली. आज सकाळी तिच्या वडीलांनी तिला देवरुख येथे एसटी बसमध्ये बसविले. त्यानंतर ती साळवीस्टॉप रत्नागिरी येथे उतरली. नजीकच एका रिक्षामध्ये ती बसली आणि रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले. ते पाणी कडू होते, असे तिने पोलिसांना जबाब देताना म्हटले आहे. रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, सदर तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता दाट असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे या प्रकारामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे