ट्रेनीनर्सवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयात जमलेल्या जमावाचे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको
१९ वर्षीय ट्रेनी नर्सवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयात अजूनही महिला व नागरिकांचा मोठा जमाव जमला आहे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको करत काही काळासाठी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद पडली होती. दहा तास उलटून गेले तरी पोलिसांच्या तपासात गती न आल्याने आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि त्याला फाशी द्या, अशी मागणी घोषणा देत करण्यात आली.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नागरिकांनी शांततेची आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.तत्पूर्वी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी पीडितांच्या आईची भेट घेतली. ही घटना निंदनीय असून, आपण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले