
जिल्हा रुग्णालयात अजूनही संतप्त जमाव,पोलिसांचे दंगल नियंत्रक पथक तैनात
रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे १९ वर्षीय ट्रेनी परीचारिकेवरील एका रिक्षाचालकाने केलेले अत्याचार प्रकरण चिघळले असून, आरोपीला फाशीची देण्याची मागणी करत जमाव आक्रमक झाला आहे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी देखील शासकीय रुग्णालयात भेट देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली तसेच सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोपही त्यांनी केला सीसीटीव्हीचे जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी ही त्यांनी केली. असे काही रुग्णालयात अजूनही जमाव जमा झाला असून महिलांची संख्या मोठी आहे ही घटना घडल्यानंतर सदर पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शासकीय रुग्णालयात आमदार राजन साळवी राजन महाडिक उदय बने विलास चाळके आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व भाजप पदाधिकारी ही तेथे उपस्थित होते पोलिसांनी ही चोख बंदोबस्त ठेवला आहे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही परिस्थिती तणावपूर्ण आहे पोलीस यंत्रणेकडून आरोपीचा शोध सुरू आहे