छत्रपती संभाजीनगर शहरात तुफान राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी अचानक आमने-सामने

*छत्रपती संभाजीनगर शहरात तुफान राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी अचानक आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आलीवाद इतका विकोपाला गेला. की दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने तणाव शांत झाला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला होता.छत्रपती संभाजीनगरामध्ये आज तिसऱ्या दिवशी सलग पॉलिटिकल राडा पाहायला मिळाला. रविवारी पंतप्रधान मोदी विमानतळावर आले तर त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरेगटाकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला उत्तर म्हणून आज भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन आले. आदित्य ठाकरे हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हॉटेलसमोर धडकले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. आमदार अंबादास दानवे भाजप पदाधिकाऱ्यांवर धावून गेले. त्यामुळे क्षणार्धात दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटांमध्ये सुरु झालेला वाद सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. सध्या पोलिसांनी भाजप आणि ठाकरे गटातील काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button