गुहागर आगाराला ८ वर्षात एकही नवीन बस नाही
दररोज २६ हजार कि.मी. अंतराचे उद्दिष्ट असलेल्या गुहागर आगाराला गेल्या आठ वर्षात एकही नवीन बस महामंडळाने दिलेली नाही. आगारात असलेल्या एकूण ६२ गाड्यांपैकी ७ गाड्या १४ वर्शापूर्वीच्या असून पुढील वर्षी त्या वापरास अयोग्य होणार आहेत. यामुळे महामंडळाने आगाराला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १८ नवीन गाड्या देणे गरजेचे आहे.आगारप्रमुख सोनाली कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारात एकूण ६२ गाड्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ वर्षापूर्वीच्या १४ गाड्या आहेत. ८ वर्षापुढील ४१ गाड्या आहेत. तर ७ गाड्यांची १५ वर्षाची मुदत संपत आली आहे.www.konkantoday.com