
गतवर्षीपेक्षा यंदा रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंड्या उभारण्याच्या संखेत घट
रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी दहीकाला उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्हयात यावर्षी २५१ सार्वजनिक तर २,६१२ खासगी दहीहंडया उभारण्यात येणार आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रूपये किमंतीची बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुवयास मिळणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी (२०२३) ३०९ सार्वजनिक तर ३,०४३ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या दहीहंड्यांमध्ये घट झाली आहे