कशेडी घाट भोगाव मार्ग धोकादायक

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव मार्ग धोकादायक स्थितीत आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. आय.आय.टी. तंत्रज्ञानांकडून उपाययोजना करण्याचे आश्‍वासन हवेत विरले आहे. यामुळे चाकरमान्यांना भोगाव मार्गावरून मार्गक्रमण करताना जीवघेणा प्रवास करावा लागणार आहे.कशेडी घाटातील भोगाव मार्ग गतमहिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुरता खचला आहे. गतमहिन्यात सिलिंडर वाहतुकीच्या ट्रकसह फोम बनवणार्‍या रसायन वाहतुकीचा ट्रक दरीत कोसळला होता. भोगावनजिक खचलेल्या रस्त्यामुळे मार्ग पूर्णतः धोकादायक आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button