
चिपळूण शहरातील रावतळे येथे हॉटेल फोडून रोख रकमेसह मोबाईल चोरीस
चिपळूण शहरातील रावतळे येथे असलेल्या सुप्रसिद्ध हॉटेल मथुरा शिवसागर अज्ञात चोरट्याने फोडून खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. चोरट्याने त्यातून रोख रक्कम ३२ हजारांसह मोबाईल असा ३४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रविंद्र तुक्रा शेट्टी (६०, चिपळूण) यांनी दिली आहे. www.konkantoday.com