पुरुषोत्तम करंडक, आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’, दिनांक २४,२५ सप्टेंबर, २०२४ रोजी. चिपळूण येथे
महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या सहयोगाने, पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा दिनांक २४ आणि २५ सप्टेंबर रोजी चिपळूण येथील स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न होणार आहे. या एकांकिका स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यामधील वरिष्ठ महाविद्यांना सहभागी होता येणार आहे.महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था पुणे येथे गेली ५९ वर्षे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ‘पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करीत असून २०१० पासून ही स्पर्धा, कोल्हापूर, जळगांव, रत्नागिरी आणि नागपूर या केंद्रांवर संपन्न होत आहे. या वर्षी ही स्पर्धा रत्नागिरी ऐवजी चिपळूण येथे घेण्यात येणार आहे.सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांनी दिनांक १० सप्टेंबर, २०२४ पर्यंत प्रवेश अर्ज, सचिव, अ. भा. म. नाट्य परिषद, शाखा चिपळूण, स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, ता. चिपळूण जि. रत्नागिरी या पत्त्यावर पाठवायचे असून, स्पर्धेचे लॉटस् १९ सप्टेंबर, २०२४ रोजी, अ. भा. म. ना. परिषद, चिपळूण शाखेच्या कार्यालयात टाकणेत येणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी श्री. मंगेश बापट, ९४२२००३४२२, श्री. संदिप जोशी ९६७३६३३४१८ आणि श्री. दिलीप आंब्रे ९६९९१२४३६३ यांच्याजवळ संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे सचिव श्री. दिलीप आंब्रे यांनी केले आहे.