
नेत्रावती एक्सप्रेस च्या थांब्याचा वर्षपूर्ती सोहळा संगमेश्वर स्थानाकात उत्साहात साजरा
वेडी माणसेच इतिहास घडवतात, कोकण रेल्वे हा कोकणच्या गळ्यातील रत्नजडीत हार कोकणी माणसांच्या जमिनी घेऊन कोकण रेल्वे झाली, परंतु जेवढा असायला पाहिजे तेवढा कोकणी माणसाला फायदा झाला नाही. कोकणासाठी एक एक्सप्रेस व दोन पॅसेंजर असून केवळ तीनच गाड्या हा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरुद्ध एक माणूस विचार करावयास लागला त्या माणसाचे नाव होते श्री संदेश जिमन! ▪️अंत्रवली गावातील या तरुणाने या गोष्टीचे वेड मनात घेतले.समविचारी मित्र गोळा केले फेसबुक पेज ओपन करून संगमेश्वर तालुक्यातील जनतेला जागृत केले संगमेश्वर रोड स्थानकासाठी एक लढा उभारला त्या लढ्याचे नेतृत्व हातामध्ये घेतले आणि सफलता सुद्धा प्राप्त केली ▪️नागपूर मडगाव मग उधना मंगलोर आणि उपोषणाचे फलित म्हणून नेत्रावती एक्सप्रेस हे झाले गाड्यांचे थांबे एवढा तीव्र झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये कोकण रेल्वेच्या प्रशासनाला संगमेश्वरचा विचार करावाच लागतो. संगमेश्वर रोड स्थानकावरील फलाट, निवारा रोडचे बांधकाम पाणपोई नवीन तयार करणे, शौचालयाचे साफसफाई करणे, बाजूच्या डोंगराला सुरक्षा भिंत महामार्गापासून रेल्वे स्थानकापर्यंत डांबरी रस्ता, PRS आगाऊ आरक्षण केंद्र अशा अनेक समस्या यामुळे सोडवण्यात आल्या. ▪️मागील 22 ऑगस्ट 2023 रोजी नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर रोड स्टेशनला थांबली. 22 ऑगस्ट 2024 ला त्यांचा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. ▪️समारंभ छोटासा पण नेत्र दीपक या सोहळ्याला राष्ट्रवादी तालुकाप्रमुख राजेंद्र पोमेंडकर श्री. आर्ते, कुणबी सेनेचे. श्री सुरेश भायजे, संगमेश्वर व्यापारी संघटनेचे रिंकू कोळवनकर ,बापू भिंगार्डे पदाधिकारी, निखिल कोळवणकर (देवरुख व्यापारी संघटना) पत्रकार एजाज पटेल,रिक्षा संघटना विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते पैसा फंड हायस्कूल यांच्या लेझीम पथकाने वर्षपूर्ती सोहळ्याला रंगत आणली. ▪️श्री राजेंद्र पोमेंडकर यांनी आमदार श्री शेखर निकम यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. ▪️संगमेश्वर रोड स्थानकात येणारी नेत्रावती थांबली आणि एकच जल्लोष करण्यात आला पूर्ण पलाटावर लेझीम पथक महाराष्ट्र परंपरा सादर करत होते गाडीवर फुले उधळत होते. प्रवासी वर्ग उत्साही होता गाडीला पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्वांना पेढे वाटण्यात आले आणि पुढील कार्याची रूपरेषा मनाशी निश्चित करून हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.▪️हा सोहळा यशस्वी होण्यासाठी समीर सप्रे, दीपक पवार,अक्षय म्हापदी,जगदीश कदम, मुकुंद सनगरे, चंद्रकांत गोवळकर,संतोष पाटणे, अशोक मुंडेकर,योगेश मालप,तेजस सुर्वे,दिलीप टोपरे,विनोद खानविलकर, नरेंद्र खानविलकर,संजय म्हपसकर यांनी मेहनत घेतली.*💫या विषयी बोलताना संदेश जिमन यांनी आपण तालुक्यासाठी काहीतरी करायचे ठरवले तेंव्हा मला तालुक्यात फारसे कुणी ओळखत नव्हते, त्यावेळी “संगमेश्वर न्यूज” चे संस्थापक कै संदेश सप्रे यांची भेट झाली आणि त्यांनी पुढील मार्ग दाखवला, दुर्दैवाने ते आजचा आनंद सोहळा पाहायला आपल्यात नाहीत परंतु त्याची आठवण मला पदोपदी येते*