केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दूरवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला
मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरावस्थेवरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत, असे सांगत आठवले यांनी या महामार्गाच्या दूरवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला आहेकेंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले. मात्र, कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत. मी रस्त्याने येणार होतो पण रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेनने यावं लागल्याचे आठवले यांनी सांगितलं. खेडमधील नागरी सत्कार कार्यक्रम दरम्यान रामदास आठवले बोलत होते. मुंबई-गोवा, मुंबई अहमदाबाद आणि मुंबई-पुणे महामार्गाच्या दूरवस्थेबाबत जनता रोष व्यक्त करत आहे. मात्र, आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेननं यावं लागलं. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे. पर्यटन विकासासाठी हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा विकास होताना कोकणाकडे दुर्लक्ष व्हायला नको, असेही आठवले म्हणाले.