कंत्राटी सफाई कामगारांना चार महिन्याचे थकीत वेतन लवकरच मिळणार -आ. राजन साळवी
जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. गणपतीपूर्वी त्यांना वेतन मिळावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.आरोग्यमंत्री ना. डॉ. तानाजी सावंत यांची आ. साळवी यांनी भेट घेवून कंत्राटी सफाई कामगारांना वेतन मिळालेले नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी आ. साळवी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्याकडून सर्व तपशील संकलित केला होता. राज्य शासनाकडून एप्रिल महिन्यापासूनचे वेतन राहिले असल्याचे ना. तानाजी सावंत यांनी सांगितले. साखरपा-लांजा- राजापूर विधानसभा मतदार संघाचे अनेक सफाई कामगारांना अद्यापही वेतन मिळालेले नाही. www.konkantoday.com