वळकेत गळफास घेवून प्रौढाची आत्महत्या

रत्नागिरी तालुक्यातील वळके येथे प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी ३ च्या सुमारास घडली. रविंद्र मधुकर सावंत (५६, रा. मराठवाडी, वळके-रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी रविंद्र सावंत यांचा मृतदेह वळके मराठवाडी येथील जुन्या घराच्या पडवीत वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button