
राजापुरातील सफाई कामगार आता रत्नागिरी पालिकेत आरोग्य निरीक्षक बनले
* सफाई कामगार म्हणून गेली पाच वर्षे राजापुरात नगर परिषदेत हंगामी पदावर कार्यरत असलेल्या प्रमित प्रकाश जाधव या कर्मचार्याची शैक्षणिक पात्रतेमुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षकपदी (सॅनिटरी इन्स्पेक्टर) नियुक्ती झाली आहे. त्याने गुरूवारी हा पदभार स्विकारला. रत्नागिरी जिल्ह्यातील हे दुसरे उदाहरण आहे. यापूर्वी सन २०२१ मध्ये चिपळूणमध्ये वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली रूजू झालेल्या महेश मधुकर जाधव या सफाई कामगारांची आरोग्य निरीक्षकपदाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चिपळूणच्या आरोग्य निरीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे. या दोघांचीही कहाणी प्रेरणादायी आहे.राजापूरच्या प्रमित जाधव यांचे वडील प्रकाश जाधव हे येथील नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करीत होते. सुमारे ३२ वर्षे त्यांनी सेवा बजावली. आजही कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी निवृत्तीनंतरही ते स्वच्छतेचे खाजगी काम करीत आहेत.www.konkantoday.com