
लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण झालेल्या रहाटाघर एसटी स्टँड मध्ये गुरांचा वावर.
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार जवळील रहाटाघर बस स्थानकाचे नुकतेच लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे यामध्ये बसण्याच्या सुविधा बसून प्रवाशांना अनेक सुख सोयी देण्यात आले आहेत मात्र या रहाटा घर स्थानकात मोकाट गुरांचा वावर वाढला असून खाद्यपदार्थ मिळण्याच्या अशाने ही गुरे बस स्थानकातच मुक्काम करीत आहेत याबाबत प्रशासनाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे