बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी तर्फे रत्नागिरी येथे तोंडावर काळी पट्टी बांधून निदर्शने
बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी तर्फे रत्नागिरी येथे तोंडावर काळी पट्टी बांधून महायुती सरकार चा जाहीर धिक्कार करण्यात आला.पुर्वी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती.परंतु मुंबई उच्च न्यायालयाने बंद करता येणार नाही असा निर्णय दिल्याने अखेर नेते व कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सरकार चा जाहीर धिक्कार केला. रत्नागिरी येथे आयोजित धिक्कार आंदोलना मध्ये विलास चाळके. कुमार शेट्ये आदींनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी.बशीर मुर्तुझा. नौशीन काझी सह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या*