पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हरचिरी जिल्हा परिषद गटात मंगळगौर संपन्न हरचिरी जिल्हा परिषद गटातील नागेश्वर महिला संघ सोमेश्वर घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक फटकावला
* महाराष्ट्राचे उद्योगमंत्री-रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तसेच उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघातील हरचिरी जिल्हा परिषद गटात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.▫️ *यामध्ये नागेश्वर महिला संघ सोमेश्वर घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक फटकावला आहे. या संघाला दहा हजार रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम जिल्हा परिषद गटांमध्ये राबवला जातो. या कार्यक्रमाचे सण म्हणून आम्ही आतुरतेने वाट पाहतो या कार्यक्रमाला महिलांच्या माध्यमातून एक वेगळा आनंद त्या दिवशी आम्हाला साजरा करता येतो. महिलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी मध्ये राबवला जात आहे हरचिरी जिल्हा परिषद गटातील मंगळा गौरी स्पर्धेला १००० पेक्षा जास्त महिलांनी हजेरी लावली होती. या स्पर्धा बालाजी मंगळ कार्यालय येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी जय गणेश महिला मंडळ झरेवाडी हे मंडळ ठरले या संघाला सात हजार रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले.तर तिसरा क्रमांक जागृती महिला मंडळ कर्ला यांनी मिळवला असुन पाच हजार रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले.यावेळेस उत्तेजनार्थ- श्रीराम महिला मंडळ कुरतडे संघाची निवड झाली त्यांना तीन हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भारती चांदोरकर, शितल शितूत यांनी काम पाहिले.यावेळी पावस गावातील अनिसा कप्तान यांनी देशभक्ती गीत गाणं सादर करून सगळ्यांची मने जिंकले. यावेळी महिला उपजिल्हा प्रमुख विनया गावडे, महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, विभाग प्रमुख रिया साळवी, उपविभाग प्रमुख फुटक मॅडम, समीरा म्हसकर ऋतुजा गोताड, सलोनी बंडबे,हातखंबा विभाग प्रमुख विद्या बोबले,अपर्णा बोरकर,शंकर झोरे, प्रशांत शेरे,भारती पिलनकर यांच्या सहित अनेक महिला उपस्थित होत्या. तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थितीत होते.कार्यक्रम नियोजन बद्ध होण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली.