
टाटा टेक्नाॕलाॕजिस लि. व म.औ. वि. महामंडळ संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत कौशल्यवर्धन केंद्र
रत्नागिरी, दि. 24 (जिमाका): जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे अभियांत्रिकी, रासायनिक व फळ प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. या औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा करणे, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार करणे तसेच रोजगार क्षमता वाढविणे आणि एमएसई ना पाठिंबा देणे याकरिता रत्नागिरी येथे कौशल्यवर्धन प्रशिक्षण केंद्र उभारणे प्रस्तावित आहे. टाटा टेक्नाॕलाॕजिस लि. व म.औ. वि. महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.(Centre for Invention, Innovation, Incubation and Training Centre (CIIIT))या प्रस्तावित प्रकल्पाकरिता महामंडळातर्फे ४०९५ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रशिक्षण केंद्रामधून दरवर्षी विविध प्रकारच्या १५६० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये विविध क्षमता केंद्रे व त्या अंतर्गत १७ प्रशिक्षण अभ्यासक्रम तीन महिने कालावधीकरिता प्रस्तावित आहे. या प्रशिक्षणमध्ये सहभागी होण्याकरिता पदवी / पदवीका / आय. टी. आय. या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत. प्रस्तावित प्रकल्प स्थापन करण्याकरिता एकूण रुपये १९१.०० कोटी खर्च अपेक्षित असून पैकी १५ टक्के महामंडळामार्फत खर्च होणार आहे. तसेच प्रशिक्षणाकरिता चौथ्या, पाचव्या व सहाव्या वर्षासाठी एकूण रुपये ३६.७९ कोटी इतका खर्च महामंडळातर्फे जमा करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त या प्रकल्पासाठी प्रशिक्षण केंद्राकरिता प्रती वर्ष रुपये २५.४० लक्ष इतका खर्च देखभाल व दुरुस्तीसाठी करणार आहे. प्रस्तावित Tata Technologies Itd. या संस्थेमार्फत Centre for Invention, Innovation, Incubation and Training Centre (CIIIT) या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे बाबत महामंडळातर्फे आवश्यक परवानग्या घेणे, पाणी व वीज पुरवठा करणे, इंटरनेट जोडणी करणे, अग्निसुरक्षा यंत्रणा पुरविणे व इतर अनुषंगिक परवानग्या प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाकरिता हार्डवेअर टेक्नॉलाजीक टुल्स्, इक्विपमेंट आणि मशिनरी या प्रशिक्षण केंद्राच्या भांडवली खर्चाचा भाग असतील. मशनरींच्या देखभालींची जबाबदारी चौथ्या वर्षापासून महामंडळाची राहील. या व्यतिरिक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत टिटिएल कर्मचारी / एसएमई यांना शक्य असल्यास शुल्क आकारणी तत्वावर निवासी सुविधा प्रदान करण्यात येईल. प्रस्तावित कौशल्यवर्धन प्रशिक्षण केंद्र उभारणी द्वारे उद्योग वाढीस होणारे फायदे प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहेत. कुशल मनुष्यबळाची तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा. स्थानिक कुशल मनुष्य बळाची आवश्यकता पूर्ण करणे साठी नैसर्गिक वातावरण निर्मिती. उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल उपलब्ध करणे, स्थानिक रोजगार क्षमता वाढवणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या CIIIT सेंटर द्वारे पाठिंबा देणे. उच्चसत्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पद्धतीने अद्यावत करणे.नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यास मदत करणे.