अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर चिरेखाण मालक, डंपर चालक यांनी आई-वडिलांशी संगनमत करून चिमुकलीचा मृतदेह पुरला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावतील सटी या डोंगर माळरानावर चिरेखाणीत 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह 15 दिवसापूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा सिंधुदुर्गात होती. या अनुषंगाने सावंतवाडी पोलिसांनी अधिक तपास करत संशयित आरोपीकडून माहिती मिळवून घटनास्थळी दाखल होत चिरेखाणी जवळ असलेल्या माळरानावर बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला.मुळ छत्तीसगड मधील हे कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील मळेवाड येथे चिरेखाणीत काम करत होते. पिडीत बालीकेच्या वडिलांना छत्तीसगड मधून बोलवून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जवळील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.एका डंपरने बालिकेला धडक दिल्यानंतर अपघात झाला होता अशी माहिती समोर येतेय. अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर डंपर चालकाने बालिकेच्या आई-वडिलांना हाताशी धरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह चिरेखाणीत दफन केला होता.मृतदेह चिरेखाणीत लपवल्याची चर्चा परिसरात बुधवारपासून होत होती. पोलिसांना याची माहिती समजताच या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ते चिरेखाणीवर दाखल झाले. आता या प्रकरणी अपघात दडपल्याबद्दल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला.चिरेखाणीत ५ ऑगस्टला अपघात झाला होता. चिरेखाणीतच काम करणाऱ्या लहान दाम्पत्याची मुलगी डंपरखाली सापडून मृत्युमुखी पडली होती. हे प्रकरण दडपण्यासाठी चिरेखाण मालक, डंपर चालक यांनी आई-वडिलांशी संगनमत करून तिचा मृतदेह लपवून ठेवला होता.चिमुकलीचा मृतदेह दफन करत हे प्रकरण दडपलं गेलं. त्यानंतर चिमुकलीच्या आई – वडिलांना त्यांच्या मूळ गावी ओडिशा इथं पाठवण्यात आलं. पण जेव्हा या प्रकाराची दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरू झाली तेव्हा सगळा प्रकार उघड झाला. आई-वडिलांना पोलीस स्टेशनला येण्यास सांगण्यात आलंय. आता या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button