
वक्फ सुधारणा विधेयकाच्या संयुक्त समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ओवेसींच्या एमआयएमने विरोध केला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगलं
* वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. संसदेच्या अधिवेशनात या विधेयकावरून गोंधळ झाला. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाच्या चर्चेवेळी उद्धव ठाकरेंचे खासदार सभागृहातून बाहेर गेले, यानंतर मुस्लिम समाजाने मातोश्रीबाहेर आंदोलनही केलं होतं.आता वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच्या संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गुगली टाकला आहे.वक्फ सुधारणा विधेयकाच्या संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ओवेसींच्या एमआयएमने विरोध केला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गुगली टाकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला गेला.वक्फ सुधारणा विधेयकाच्या संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ओवेसींच्या एमआयएमने विरोध केला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गुगली टाकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला गेला.वक्फ कायदा सुधारणा विधेयकाच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक दिल्लीत पार पडली. शिवसेनेकडून नरेश म्हस्के, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळ्यामामा म्हात्रे हे खासदार उपस्थित होते.राजकारण करण्यासाठी वक्फचं बिल आणण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी हा खटाटोप असल्याची भूमिका उद्धव ठाकरेंच्या पक्षाने बैठकीत मांडली. उद्या हिंदूंचं देवस्थान, मंदिरात मुस्लिम सदस्य घेण्याचा विषय आला तर काय? असं म्हणत वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्य नेमण्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सवाल उपस्थित केला. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन करण्यात आलं. एकापेक्षा जास्त धर्माचा दावा असणाऱ्या जमिनींचे वाद सोडवण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला द्यावेत, अशी या विधेयकाबाबतची सूचना शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.