
राजापूर रेल्वेस्टेशनला अन्य एक्सप्रेसना थांबा द्या
कोकण रेल्वे मार्गावर काम करणार्या वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने राजापूर रोड व सौंदळ रेल्वेस्टेशन येथे जादा रेल्वेना थांबा देण्यात यावा, अशी मागणी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, मुंबईच्यावतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.राजापूर रोड व सौंदळ रेल्वेस्टेशन येथे अतिरिक्त रेल्वेगाड्यांना थांबे मिळाल्यास राजापूर तालुक्यातील दळणवळणामध्ये भर पडून स्थानिक रोजगार व व्यवसायाला चालना मिळेल. यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी यशवंत जड्यार यांनी केल्याचे सांगितले. या संघटनेच्यावतीने मागणीच्या प्रति खासदार नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, राजापूर रोड रेल्वेस्टेशन मास्तर यांना देण्यात आल्याचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले. www.konkantoday.com