नवा जगबुडी पूल मार्गिका अखेर खुली
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील एका मार्किकेच्या मध्यभागी उखडलेल्या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होवून देखील वाहतूक बंद होती. अखेर बुधवारपासून पुलावरील वाहतूक खुली झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील एका मार्गिकेचा मध्यभाग उखडल्याने पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक तातडीने बंद केली. राष्ट्रीय महामार्ग खात्याने तातडीने उखडलेल्या मध्यभागाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. दुरूस्ती कामासाठी महिनाभराचा कालावधी लागला होता. www.konkantoday.com