
गजानन किर्तीकरांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज-रामदास कदम
शिवसेना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन रामदास कदम आणि खासदार गजानन किर्तीकरांमध्ये वाद सुरू आहे.रामदास कदम (यांनी गजानन किर्तीकर यांच्या मतदार संघावर दावा सांगितल्यानंतर किर्तीकरांनी अधिकृत पत्राद्वारे रामदास कदम यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना रामदास कदम यांनी गजानन किर्तीकरांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.सध्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीतच शिमगा बघायला मिळतोय. शिवसेनेच्या नेत्यांमध्येच फटाके फुटत आहेत. हे चित्र दुर्दैवी असून हा बेशिस्तपणा असल्याचे रामदास कदम म्हणत गजाभाऊंसारख्या जेष्ठ नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती..” असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.
” गजानन किर्तीकरांना पाडण्याचा मी १९९० मध्ये प्रयत्न केला होता. हा आरोप पुर्णपणे खोटा असून माझ्या बदनामीसाठी हे कटकारस्थान रचल्याचा गंभीर आरोपही यावेळी रामदास कदम यांनी केला. ९० मधील निवडणुकीची आत्ता ३० वर्षानंतर आठवण आली का?” असा सवालही रामदास कदमांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com