
कोरेची सौरऊर्जेपासून ३.१८ लाख युनिट वीजनिर्मिती
कोकण रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात स्पर्धात्मक निविदांद्वारे १२०० कोटी रुपयांहून अधिक नवीन प्रकल्पाची उभारणी करत ३०१ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. जानेवारी ते जुलै या ७ महिन्यांच्या कालावधीत कोकण रेल्वेने सौरउर्जेपासून ३.१८ लाख युनिट वीजनिर्मिती करत उर्जाबिलांमध्ये ३८.५६ लाख रुपयांची बचत करण्यात यश मिळवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने कामगिरीचा लेखाजोखा जाहीर केला आहे.कोकण रेल्वेने जानेवारी ते जुलै या ७ महिन्यांच्या कालावधीत १५,३९९ रेल्वेगाड्या चालवल्या. त्यात १८१ उन्हाळी विशेष गाड्यांसह ११,४४४ पॅसेंजर गाड्या व ३,९५५ मालगाड्यांचा समावेश आहे. जुने गोवा व पेडणे बोगद्यांच्या बांधकामासाठी १,४८६ कोटी रुपयांच्या भागिदारीस मान्यता दिली आहे. कर्नाटकातील ठोकूर व मालवाहतुकीच्या शेडचे काम देखील पूर्ण केले आहे. उड्डपी (कर्नाटक), इंदापूर (महाराष्ट्र) वेर्णा (गोवा) येथील मालवाहतुकीच्या शेडचे काम प्रगतीपथावर असल्याचे यावेळी नमूद केले आहे.www.konkantoday.com