
प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक, नाटककार, कादंबरीकार, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले महत्त्व असल्याचं सांगितलं. ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी राज्यभरातील ग्रंथालयांना मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसार करिता, CSR फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं.
ह्यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या पुस्तकातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. विवेकानंद यांच्यावर लेखन करणे हे धाडसाचे कार्य असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संत साहित्य अभ्यासक, लेखक श्री सदानंद मोरे, रवींद्र शोभणे,श्री अशोक समेळ, अभिनेते, कवी श्री. किशोर कदम, श्री अशोक बागवे, कवी श्री प्रविण दवणे, श्रीमती नमिता कीर, संतोष राणे, अशोक चिटणीस, विलास जोशी यांसह नागरिक उपस्थित होते.