
मोबाईल शॉपी फोडून १० लाखांचा ऐवज लंपास
राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल व अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. त्यामध्ये मोबाईल हॅण्डसेटसह रोख रक्कम मिळून सुमारे १० लाख रक्कमेचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे पुढे आले आहे. या घटनेमुळे नाटे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. चोरट्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र चोरट्यांना शोधण्यात त्याला अपयश आले.नाटे सडापेठ बाजारपेठेतील एसटी स्टँडनजिक नासीर काझी यांची जैद मोबाईल शॉपी आहे. ही शॉपी चोरट्यांनी फोडल्याचे मालक काझी यांच्या बुधवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामध्ये दुकानातील हॅण्डसेट आणि रोख रकमेचे लॉकर चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. www.konkantoday.com