टी .एस .रेहमान संस्थेचे विद्यार्थ्यांना नोकरी विषयक मार्गदर्शन
*टी .एस .रेहमान संस्थेचे विद्यार्थ्यांना नोकरी विषयक मार्गदर्शन* रविवारी दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता कोकणातील विद्यार्थी विद्यार्थिनींना जहाजावरील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या कशा मिळव्यात याचे मार्गदर्शन 1920 साली स्थापन झालेल्या उरण रायगड येथील मान्यता प्राप्त *टी एस रेहमान* शिक्षण संस्थेचे प्राचार्य *कॅप्टन आशुतोष आपणकर* व प्राध्यापक करणार आहेत .त्याचबरोबर या क्षेत्रातील नोकऱ्या देण्याऱ्या संस्थेचे प्रमुख प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. भंडारी समाजाचे महाअधिवेशन रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.अधिवेशनांच्या पहिल्या सत्रामध्ये कोकण किनारपट्टीवरील विद्यार्थी विद्यार्थीनींना नोकरी विषय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शिक्षण क्षेत्रात पुढे येण्यासाठी भंडारी समाजमंडळे कार्य करणार आहेत .कोकण किनारपट्टीवर वसलेल्या विद्यार्थ्याना याचा फायदा होणार आहे. तरी या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी, कनिष्ठ व ज्येष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी *सकाळी८:३०* *वाजता सावरकर नाट्यगृह,* रत्नागिरी येथेउपस्थितीत राहावे .असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या उपाध्यक्षा *ॲड सौ .प्रज्ञा तिवरेकर* यांनी केले आहे.