आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत गाव कळझोंडी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न
*. आज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांचे विद्यमाने जिल्हा रुग्णालय रत्नागिरी समता फाऊंडेशन मुंबई व ग्राम पंचायत कळझोंडी यांचे वतीने आरोग्य उपकेंद्र कळझोंडी येथे मोतीबिंदू तपासणी व मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या वेळी 46 नागरिकांची नेत्र तपासणी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संदीप उगवेकर यांनी केली त्यातील 8 रुग्ण मोतीबिंदू सदृश्य आढळले आहेत त्याची येत्या बुधवारी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव व डॉ. सुनिता पवार यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर यांनी विशेष मेहनत घेतली या वेळी समता फाऊंडेशन मुंबई चे वतीने श्री. नितेश शेट्ये ग्राम पंचायत सदस्या श्रीम.अंजली शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्री.उदय अगोंडे व श्री. सूर्यकांत बंडबे उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्या साठी समूह आरोग्य अधिकारी कळझोंडी च्या श्रीम. अक्षता शिर्सेकर आरोग्य सेविका श्रीम. वीणा शिरगावकर गाव कळझोंडी येथील आशा सेविका मदतनीस यानी विशेष मेहनत घेतली