
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, व्याख्यानकार, लेखक, कवी व टिळक चरित्राचे अभ्यासक मा.श्री.चंद्रशेखर टिळक यांची सदिच्छा भेट
आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, व्याख्यानकार, लेखक, कवी व टिळक चरित्राचे अभ्यासक मा.श्री.चंद्रशेखर टिळक स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ व स्वामी स्वरूपानंदांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा त्यांना सादर केला. संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. उत्तम वसुलीबाबत अॅड.दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. तसेच गुंतवणुकीबाबत उपलब्ध असणारे विविध पर्याय यावर संस्थेचे अध्यक्ष अॅड.पटवर्धन यांचेसोबत चर्चा केली. यावेळी जनता बँकेचे शाखाव्यवस्थापक श्री.सरदेसाई, संस्थेचे व्यवस्थापक श्री.मोहन बापट व उपव्यवस्थापक श्री.हेमंत रेडीज उपस्थित होते.