वेळणेश्वर ग्रामसेविकेची एक वेतनवाढ रोखली
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर सरपंच, ग्रामसेवक यांनी २९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या बोगस निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुहागर पंचायत समितीने संबंधित ग्रामसेविकेची एक वेतनवाढ थांबवण्याची प्रशासकीय कारवाई केली आहे.गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या बोगस निविदा प्रसिद्धी प्रकरणी वेळणेश्वर येथील सुरेश घाग यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.www.konkantoday.com