
संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथे महामार्ग ठेकेदाराचा जीवघेणा खेळ सुरूच, वीजखांब कोसळण्याच्या स्थितीत.
संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील जुन्या ग्रामपंचायतजवळ महामार्ग ठेकेदाराने खोदाई केली आहे. मात्र ही खोदाई केल्यानंतर येथे असणार्या वीज खांब केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या खांबाला तातडीने आधार द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.महामार्ग ठेकेदाराने संगमेश्वर ते शास्त्री पूलपर्यंत अक्षरशः जनतेच्या जीवाशी जीवघेणा खेळ मांडला आहे. महामार्गाचे काम करताना मार्ग लगतच्या ठिकाणच्या दरड व डोंगराची खोदाई केल्यानंतर भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन त्या ठिकाणी संरक्षण भिंती वा कायमस्वरूपी अन्य संरक्षण उपाय योजना न केल्याने अनेक ठिकाणच्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहे. माती व त्याबरोबर भल मोठे दगड तसेच डोंगर दरडीवरील उभी झाडे महामार्गांवर कोसळत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक वदर्ळीला याचा फार मोठा फटका बसत आहे.www.konkantoday.com