मनसेचे प्रदूषण नियंत्रण कार्यालयाबाहेर ठिय्या
जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेडमधील लोटे एमआयडीसी परिसरामध्ये खुलेआम उघड्यावर घातक रासायनिक सांडपाणी सोडणार्या कंपन्यांवर पुराव्यानिशी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी २४ तासात कंपनीला बंदीची नोटीस दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई न करता व नोटीस न देता प्रदूषण करणार्या कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाठिशी घालत असल्याचा आरोप चिपळूण येथील महाराष्ट्र नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. www.konkantoday.com