मंडणगड स्टेट बँक शाखेची एटीएम सेवा महिनाभरापासून बंद

मंडणगड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची एटीएम सेवा गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. यामुळे ग्राहकांची गैयसोय होत आहे.मंडणगड शहरात बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन राष्ट्रीयकृत बँका व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा केवळ तीन बँकांची एटीएम केंद्रे कार्यरत आहेत. यातील बहुतांश केंद्रे आठवड्यातील शेवटचे तीन दिवस बंद असतात. यामुळे आठवडा अखेरीस आर्थिक व्यवहार करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते. शिवाय अन्य दिवशी गर्दीला सामोरे जावे लागते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button