
बहिणींच्या मदतीला धावून येणार- किरण सामंत
लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर राज्यात युती शासनाच्या माध्यमातून आगामी काळात महिलांसाठी अनेक योजना येवू घातल्या आहेत. लाडकी बहिण ही योजना राज्यात यशस्वी झाली आहे. यापुढे बहिणींच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बहिणींच्या अडीअडचणींच्या काळात सख्ख्या भावासारखा धावून येणार, आपला या भावाला कायम पाठिंबा असू द्या, असे आवाहन लाडकी बहिण योजनेचे विभागीय अध्यक्ष तथा शिवसेना नेते किरण सामंत यांनी ओणी येथे केले.येथील श्री गजानन मंगल कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.www.konkantoday.com




