जगबुडी नदीपात्रातील पाणी झाले गढूळ
गेल्या आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच जगबुडी नदीपात्रातील पाणी गेल्या दोन दिवसांपासून गढूळ झाले आहे. यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. गेल्या आठवडयापासून पावसाने उसंत घेतली आहे. पावसाने उघडीप घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कडक उष्म्यामुळे भातशेतीही करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात ओसंडून वाहणार्या जगबुडी नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून जगबुडी नदीतील पाणी पूर्णपणे गढूळ झाले आहे. पाऊस नसतानाही पाणी गढूळ झाले कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.www.konkantoday.com