
खेड “आपला दवाखाना” औषधाविना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य रूग्णांच्या सेवेसाठी राज्यभरात आपला दवाखाना सुरू झाला आहे. येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यातही आपला दवाखाना सुरू झाला आहे. मात्र या दवाखान्यात औषधांचा पत्ताच नसल्याची बाब समोर आली आहे. औषधाअभावी रूग्णांची हेळसांड होत असून आर्थिक भुर्दंड सहन करत औषधे खरेदी करावी लागत आहेत.शहरात डेंग्यूसह तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. रूग्ण तपासणीसाठी नगरपरिषदेच्या एकविरानगर येथील इमारतीलगत सुरू झालेल्या आपला दवाखान्यात उपचारासाठी जात आहेत. मात्र या ठिकाणी गेल्यानंतर औषधेच मिळत नसल्याने खाजगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. www.konkantoday.com