खवटी येथील अनधिकृत उत्खनन, १ कोटी ३१ लाख दंडाची कारवाई
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे खवटी सतीचा कोंड येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याची ओरड झाल्यानंतर वृत्तपत्राने वस्तुनिष्ठ प्रसिद्धी दिल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्याप्रमाणे खेड तहसिलदार यांनी १ कोटी ३१ लाख २५ हजारांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे.मौजे खवटी सतीचा कोंड येथे राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती तक्रारदार कुसाळकर यांनी दिल्यानंतर स्थानिक प्रसार माध्यमांनी तेथे लक्ष वेधून थेट त्यांचे वृत्तांकन केले. याची दखल महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८-७७.८ अन्वये मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लांबी रूंदी उंचीप्रमाणे मापे घेत तेथील साठा पाहून ५०५ ब्रास मातीचे उत्खनन झाल्याचा अहवाल तहसिलदार यांना दिल्यानंतर तहसिलदार यांनी यावरती शासकीय दराने स्वामित्वधन ६०० रुपयांप्रमाणे ५०५ ब्रास व बाजारमूल्य रू. ५००० प्रती ब्रासप्रमाणे पाचपट दंड म्हणून १ कोटी ३१ लाख २५ हजाराची दंडात्मक कारवाई केली.www.konkantoday.com