
खेड येथील काजल मोरेने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत चमक दाखवली
खेड तालुक्यातील मोहाने येथील काजल मोरे हिने भारताच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय महिला खो-खो लीग अंतर्गत भारतीय खेळ प्राधिकरण व भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने राजस्थान येथे झालेल्या खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो-खो लीग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुंबई संघातून खेळत चमकली.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पधेत महाराष्ट्रासह इतर १२ राज्यांचा समावेश होता. १४ किशोरी व १८ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत काजल मोरे महाराष्ट्राच्या मुंबई संघातून खेळत तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरले. याबद्दल तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.www.konkantoday.com