रामदास कदम यांच्या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा आक्रमक ,अनेक ठिकाणी निदर्शने पुतळे जाळले
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बद्दल रामदास कदम यांच्या वक्तव्यनंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. रामदास कदम यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा दापोली मतदार संघात महायुतीचा उमेदवार योगेश कदम स्वीकारणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. जिल्हाप्रमुख केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ही भूमिका जाहीर केली.शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या विधानाचे पडसाद कोकणात पडले आहेत. माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गावर त्यांच्याविरोधात निदर्शनेकरण्यात आली. रामदास कदम यांच्या विरोधात रत्नागिरीत भाजपने जोरदार निदर्शने केली. रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे भाजप कार्यकर्ते आक्रमक दिसले.सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी रामदास कदमांचा पुतळा जाळण्यात आला. .भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी रामदास कदमांचा पुतळा जाळला. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीयावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी जोडे मारत निषेध नोंदविला.