
रामदास कदम यांच्या विरोधात भाजपचे जोडे मारो आंदोलन
शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद चिघळला आहे. नालासोपारा येथे रामदास कदम यांच्या विरोधात भाजपाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. रामदास कदम यांच्या पोस्टरवर फुली मारून प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केलं. भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पालघरमध्येही रामदास कदम यांच्या विरोधात भाजपाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. पालघरच्या हुतात्मा चौकात रामदास कदम यांचा पुतळा जाळत भाजपचे जोडे मारो आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.