मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्यात सर्वांनी दक्ष राहून जबाबदारी पार पाडावी महिला सन्मान मेळाव्यासाठी आवश्यक सुविधांवर भर द्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचना पालकमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा
रत्नागिरी, दि.२० ऑगस्ट २०२४): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या बुधवार दि. २१ आॕगस्ट रोजी दौऱ्यावर येत आहेत. विमानतळ टर्मिनल भूमिपूजन, लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण आणि इमारत लोकार्पण व महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत चंपक मैदानावर महिला सन्मान सोहळा होत आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी दक्ष राहून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.* जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, आरोग्य विभागाने कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची सोय करावी. चंपक मैदान येथे 15 बेडचे हॉस्पिटल तयार करावे. पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी पार्किंगची व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आणि वाहतूक नियमन करावे. वाहतूक कोंडी होणार याची दक्षता घ्यावी. पिण्याची पाण्याची व्यवस्था, फूड पॅकेटची व्यवस्था, नाश्ता याबाबतही नियोजन करावे. त्याचबरोबर स्वच्छता गृहांची सोय देखील ठेवावी. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.