मंकीपॉक्स बाबत काळजी घ्या, -मंकीपॉक्स बाबत नागरिकांनी घाबरून जावू नका
* सध्या जगात विविध देशात मंकीपॉक्स (monkeypox) या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.स्वीडन व पाकिस्तान या देशांनी मंकीपॉक्स बाधित रुग्ण नोंदवले आहेत.*काय आहे मंकीपॉक्स (Monkeypox) आजार? मंकीपॉक्स का आजार orthopox या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो.काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्रोत आहेत.*या आजाराचा अधिशयन कालावधी:-6 ते 13 दिवस तथापि 5 ते 21 दिवसापर्यंत असू शकतो. *रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी :-अंगावर पुरळ उभठण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्ण पणे मावळेपर्यंत,( बाधित व्यक्ती इतर व्यक्तिसाठी संसर्गजन्य असतो).प्रसार करता होतो? थेट शारिरीक संपर्क, शरीरद्रव्य, लैंगिक संपर्क किवा जखम,घाव यातील स्त्राव तसेच खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठया थेंबाद्वारे होऊ शकतो, बाधित प्राणी चावल्यामुळे *संशयित रुग्ण कोणाला म्हणावे?मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्स बाधीत देशामध्ये प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तीच्या शरिरावर आचानक पुरळ उठणे तसेच सुजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा यापैकी एक क्षण असलेली व्यक्ती म्हणजे संशयित रुग्ण होय.*लक्षणे – लसिका ग्रंथीला सूज (कानामागील तसेच काखेतील लसिका ग्रंथीना सूज येणे),डोकेदुखी, अंगदुखी, घाम येणे,घसा खवखवणे, खोकला येणे.कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि कमी रोग प्रतिकारशक्ती असलेल्याना हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. *मंकीपॉक्स सदृश्य आजार :- कांजण्या,नागीन ,गोवर, सिफिलीस,हँड फुट माउथ डिसीज इत्यादी,*उपाययोजना काय कराव्यात?- संशयित मंकीपॉक्स रुग्णाला वेळीच विलगीकरण करावे,- रुग्णाच्या कपडयांची अथवा अंथरूण पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.- हाताची स्वच्छता ठेवणे.- रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे. मंकीपॉक्स बाबत नागरिकांनी घाबरून जावू नका कारण मंकीपॉक्स हा आजार आपल्या देशात किंवा राज्यात आत्तापर्यंत आलेला नाही.जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना याबाबत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहेत.परंतु खबरदारी म्हणून नागरिकांनी मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून परत आलेल्या प्रवासी नागरिकांना अशा प्रकारची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे. -डॉ. अनिरुद्ध आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी