बदलापूरमधील रेल्वे स्थानकातील रुळांवर बसलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज,बदलापूर रेल्वे स्थानक अखेर मोकळे केले
बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना फशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन केले होते.गेल्या दहा तासांपासून आंदोलन सुरू होते. दहा तास रेल्वे विभागाला याचा फटका बसला होता. मात्र आंदोलकांनी आपला ठिय्या काही हलवला नाही. पोलिसांसह स्थानिक आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते, मात्र आंदोलक मागे हटले नाहीत अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. बदलापूरमधील रेल्वे स्थानकातील रुळांवर बसलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली याला पोलिसांनीही दगडफेक करत प्रत्तुत्तर दिले आणि बदलापूर रेल्वे स्थानक मोकळे केले.पोलीस सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानीक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. यामुळे जवळपास नऊ ते दहा तास रेल्वे मार्ग ठप्प होता. अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात रेल्वे रूळ मोकळे झाले. आंदोलक लाठी हल्ल्यानंतर चिडले. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. रेल्वे स्थानकातून आंदोलन हटवल्यानंतर स्थानकाबाहेर आंदोलक रेल्वे स्थानकात शिरण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी त्यांना पळवून लावले.www.konkantoday.com