बदलापुरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर एका 23 वर्षीय सफाई कर्मचारा कडून लैंगिक शोषण,आज बदलापुरात बंद
बदलापुरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर एका 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचं उघड झाल्यानंतर शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.साडे तीन ते चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. शाळेकडून हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप केला जात असल्याने पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. आज बदलापुरात बंद पुकारण्यात आला असून शाळेच्या गेटवर नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.याशिवाय काही नागरिकांनी बदलापुरात रेल रोको केला. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा मार्ग रोखला. आज सकाळपासून बदलापुरातील रिक्षा सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहे.या प्रकरणातील आरोपी अटकेत असला तरी पोलीस प्रशासनासह शाळेतील व्यवस्थापनावरही सवाल उपस्थित केला जात आहे. शाळेकडून या प्रकरणात कारवाई करण्यात आली असून शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्यामुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात नेआण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.