
तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटरस्ता आज सकाळी खचला
हवामान खात्याने दिलेल्या इशार्याप्रमाणे कोकणासह सिंधुदुर्गजिल्हयात मुसळधार पाऊस कोसळत आहे सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटरस्ता आज ता.१२ खचला.त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे.पोलीसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेवुन तात्पुरती डागडुजी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
www.konkantoday.com